दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
यावर्षी ५ ऑगस्ट ते २ सप्टेंबर असे पाच श्रावणी सोमवार आल्याने शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. फलटण शहरातील नागेश मंदिर तसेच मलठणमधील शिवमंदिरातही भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत.
फलटणमधील वनदेवशेरी या हद्दीत जावळी रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस दक्षिण उघड्या महादेवाचे ठिकाण आहे. येथे पिंडही उघडी असून शंकराचे वाहन बैलही उघडाच आहे. श्रावण महिन्यात पाच सोमवार येणे फार दुर्मिळ योग आहे. त्यामुळे येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
एकंदरीत सध्या वातावरण चैतन्य व भक्तिभावाचे झाले आहे. येथे नरसोबानगर, अक्षतनगर, बुवासाहेब नगर, शारदानगर, पखाले मळा, मालोजीनगर आदी भागातून येणारे भाविक मनोभावे या उघड्या शिवलिंगाचे दर्शन घेताना दिसून येत आहेत. श्रावणात केलेल्या शिवभक्तीला महत्त्व असल्याने माता-भगिनी भक्तीभावाने येथे दर्शन घेताना दिसत आहेत.