विधानपरिषद निवडणूक: भाजपकडून महाराष्ट्रातील ६ उमेदवारांची घोषणा; विवेक कोल्हे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह दिग्गजांना संधी


आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीने ६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये द्विवार्षिक निवडणुकीसाठी ५ तर पोटनिवडणुकीसाठी १ उमेदवाराचा समावेश आहे.

स्थैर्य, मुंबई, दि. २८ एप्रिल : भारतीय जनता पार्टीच्या (BJP) केंद्रीय निवडणूक समितीने आगामी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Elections) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून आज (दि. २८ एप्रिल) दोन स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकांद्वारे महाराष्ट्रातील एकूण ६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी (Biennial Elections) महाराष्ट्रातून ५ उमेदवारांना, तर एका जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (By-election) १ उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेले विधानपरिषदेचे उमेदवार खालीलप्रमाणे:

■ द्विवार्षिक निवडणुकीसाठी (Biennial Elections 2026):

या निवडणुकीसाठी पक्षाने खालील ५ नावांवर शिक्कामोर्तब केले आहे:
१. श्री. सुनील विनायक कर्जतकर (Shri Sunil Vinayak Karjatkar)
२. श्रीमती माधवी नाईक (Smt. Madhavi Naik)
३. श्री. संजय नथ्थूजी भेंडे (Shri Sanjay Natthuji Bhende)
४. श्री. विवेक बिपिनदादा कोल्हे (Shri Vivek Bipindada Kolhe)
५. श्री. प्रमोद शांताराम जठार (Shri Pramod Shantaram Jathar)

■ पोटनिवडणुकीसाठी (By-election 2026):

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी खालील उमेदवाराला संधी देण्यात आली आहे:

१. डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Dr. Pradnya Rajeev Satav (सोबतच बिहारमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी श्री. सूर्य कुमार शर्मा यांचीही उमेदवारी याच पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.)

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. या यादीत पक्षाचे निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना संधी देऊन भाजपने राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!