
दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
बहीण-भावाच्या प्रेमाच्या त्यागातील ऋणानुबंधाची वीण अधिक घट्ट करणारा राखी पौर्णिमेचा सण यंदाच्या श्रावणात १९ ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावणी सोमवारी येत आहे. या पार्श्वभूमीवर महिला भगिनी राख्यांच्या खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत.
फलटण बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्या उपलब्ध असून विक्रेत्यांनी आपले स्टॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या फळबाजार, शंकर मार्केट, महात्मा फुले चौक आणि परिसरात लावले आहेत. स्टेशनरी दुकानातही राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
आकर्षक गोंडे असलेल्या, छोट्या आकर्षक खड्यांनी सजविण्यात आलेल्या मनमोहक रंगासह नक्षीकाम असलेल्या राख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. बालचमूंसाठी विशिष्ट प्रकारच्या राख्या रक्षाबंधनाचा सणासाठी उपलब्ध आहेत. भावाला राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे.