
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२: येथील पोवई नाक्यावरील रजतहीम सागर आइस्क्रीम पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचा ठपका ठेवून सातारा शहर पोलिसांनी राहुल कृष्णराव घायताडे (वय ४१ रा. गुरुवार पेठ सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे आइस्क्रीम पार्लर दि. ३० रोजी रात्री दहापर्यंत सुरू होते. सातारा शहर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तेथे पाहणी करून संबंधितावर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विलास गेडाम यांनी फिर्याद दिली आहे.
