ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात होणार इंग्लंड विरुद्ध क्रिकेट मालिका; पाहा कधी होणार सामने


 

स्थैर्य, दि.२५: कोरोना या साथीच्या आजारामुळे काहीकाळ कोणत्याही प्रकारच्या क्रीडा
स्पर्धांचे आयोजन झाले नाही. मात्र जवळपास ४ महिन्यांच्या विश्रांतीनंतर
जैव सुरक्षित वातावरणात क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ लागले. नुकतीच आयपीएल
ही टी20 स्पर्धाही जैव सुरक्षित वातावरणात पार पडली.

आता जगभरात
क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. यातच भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात 3 वनडे, 3 टी20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र
या मालिकेनंतरही भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मालिका खेळायची आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनामुळे निधन

फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होईल सामने- गांगुली

लिव्हिंग गार्ड एजीने आयोजित केलेल्या एका वर्चुअल पत्रकार परिषदेत
बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, “इंग्लंड क्रिकेट संघ
चार कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौरा करेल.

फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत या मालिकेचे आयोजन केले जाईल.”

परिस्थितीचे करावे लागेल आकलन

पुढे बोलताना गांगुली म्हणाले की, “द्विपक्षीय मालिका घेणे सोपे आहे, कारण
त्यात फक्त दोनच संघ असतात. आम्हाला परिस्थितीचे आकलन करावे लागेल.
कोव्हिड-19 ची दुसरी लाट येण्याचीही चर्चा आहे. आम्हाला सतर्क राहावे
लागेल.”

पडीक उमेदवारांना नाकारा : कोकाटे

आयपीएल भारतात आयोजित करण्याचे करू प्रयत्न

आयपीएलच्या पुढील हंगामाविषयी बोलताना गांगुली म्हणाले की, “आयपीएल ही
स्पर्धा भारतातच व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ही स्पर्धा
भारतीयांसाठी आहे. मी बर्‍याचदा लोकांना सांगतो की भारतासाठी आयपीएलचे काय
महत्व आहे हे पाहण्यासाठी तुम्ही येथे यायला हवं.”

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ सज्ज

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “सध्या
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. या संघाने क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला
आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची आणखी कोणतीही प्रकरणे आढळली नाहीत.
मैदानावर पाऊल ठेवण्यास खेळाडू सज्ज आहेत.”

वाई आगारातील वाहकाचा कोरोनाने घेतला बळी मुंबईहुन ड्युटी करून आल्यानंतर त्यांना त्रास होत होता


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!