मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या मंत्रालयीन सचिव पदी शाहरुख मुलाणी यांची नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि ४: मंत्रालयातील कामकाजाचा गाढा अभ्यास असणारे तसेच ओबीसी चळवळीतील नेते शाहरुख मुलाणी यांची मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (MASS) च्या मंत्रालयीन सचिव पदी नियुक्ती प्रदेश अध्यक्ष रशीद शेख यांनी ई-मेल द्वारे नियुक्ती पत्र देत केली.

यावेळी मुलाणी म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे 01 कोटी 29 लाख इतकी लोकसंख्या आहे. त्यापैकी बहुसंख्य हे बलुतेदार पद्धतीने काम करत आहेत. लॉकडाऊन मुळे त्यांचे उदरनिर्वाह होणे अडचणीचे झाले आहेत. अशात अल्पसंख्याक आयोगाला अधिकार व निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार, मुस्लीम विद्यार्थ्यांना शिषवृत्ती मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडचणी सोडवून, प्रत्येक जिल्ह्यात मुला – मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सरकारने स्थापन करावे, आरक्षणाचा विचार व्हावा यासाठी मंत्रालय पातळीवर मंत्र्यांनी राज्यातील विविध संघटनांशी चर्चा करावी, मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे बालमजूर व बाल गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने शिक्षणावर भर देणे, शिषवृत्ती साठी होणारी दिरंगाई थांबविण्यासाठी विशेष नियमावली शासनाने करावी, मुस्लीम बहुल भागात मराठी भाषेची जागृती करणे, मुस्लीम ओबीसी साठी शासकीय अनुदानित कोर्स वाढवणे, उर्दू भाषेचा दर्जा खालावत चालला आहे त्यामुळे उर्दू शाळेचा दर्जा सुधारणे, राज्यात 10 टक्के मुसलमान लोकसंख्या आहे, त्यातील 40 लाख लोक हे उर्दू बोलतात त्यांच्यासाठी उर्दू भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी मासिक सुरु करावे म्हणून डीजीआयपीआर विभागात पाठपुरावा करणे, शिषवृत्ती 25 हजार वरून 50 हजार करणे, परदेश शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज मौलाना आझाद महामंडळ तर्फे द्यावे साठी पाठपुरावा करणे, इंजि. पदवी सारखी फार्मसीची शिक्षण पद्धत सुरु करणे, मुंबई जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ मध्ये तात्काळ वस्तीगृहासाठी मंजुरी मिळावणे, मुस्लीम ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी बार्टी व सारथी च्या धर्तीवर एखादे संचालनालय किंवा संस्था स्थापन व्हावे, अल्पसंख्याक विभागाला अनुदानात वाढ व्हावी, तसेच महत्वाचे म्हणजे अल्पसंख्याक विभागातील शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी असलेले अनुदान 02 लाखावरून किमान 05 लाख करण्यात यावे अशा समाजहिताच्या सर्व प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे नवनियुक्त मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (MASS) चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी प्रतिक्रिया देतान आवर्जून मत व्यक्त केले. प्रामुख्याने म्हणजे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या मुद्दावर प्रशासन लक्ष तर देतच आहे त्याच बरोबर मुस्लीम आरक्षण कडे अभिर्याने घ्यावे असे मुलाणी स्पष्ट मत व्यक्त केले.

दरम्यान मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य (MASS) चे संस्थापकीय अध्यक्ष आमीर शेख, प्रदेश अध्यक्ष रशीद शेख, प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते हाजी सय्यद इरशाद अशरफी, प्रदेश महासचिव डॉ. परवेज अशरफी, प्रदेश मीडिया प्रमुख सलमान शेख यांच्या सह आदी पदाधिकारी यांनी मुलाणी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर शाहरुख मुलाणी यांच्या निवड झाल्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!