
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा दि.४: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 598 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 99 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
99 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
फलटण येथील 54, पानमळेवाडी 21, महाबळेश्वर 15, पिंपोडा येथील 6असे एकूण 99 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 150024
एकूण बाधित — 39168
घरी सोडण्यात आलेले — 30092
मृत्यू — 1234
उपचारार्थ रुग्ण — 7824
