एंजल वनची ग्राहकसंख्या १३.३३ दशलक्षांवर पोहोचली


दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । मुंबई । फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या ग्राहक संख्येमध्ये वार्षिक ५२.२ टक्क्यांची प्रभावी वाढ केली, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या १३.३३ दशलक्षांपर्यंत पोहोचली, ज्यामध्ये ग्राहक संपादन ०.४५ दशलक्ष होते.

कंपनीने फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्व व्यवसाय घटकांमध्ये प्रबळ वाढीची नोंद केली. कंपनीचा रिटेल उलाढाल मार्केट शेअर २२.६ टक्क्यांसह वार्षिक १७८ बीपीएसपर्यंत वाढला. सोबत, एकूण सरासरी दैनिक उलाढाल वार्षिक ९७.८ टक्क्यांच्या वाढीसह १७.५७ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचली. ऑर्डर्सची संख्या ८३.५० दशलक्षांपर्यंत वाढली, ज्यामध्ये वार्षिक १८.८ टक्क्यांची वाढ झाली. सरासरी ग्राहक फंडिंग बुक १२.९९ बिलियन रूपये राहिले.

एंजल वन लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘आमच्या व्यवसायामध्ये सुरू असलेल्या प्रगतीला आमच्या प्रबळ तंत्रज्ञान-सक्षम विकास धोरणांचा पाठिंबा आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे फायदा घेत आम्ही लोकांना त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात इक्विटी आणि संबंधित उत्पादनांचे लाभ मिळवून देण्यासाठी सक्षम करत आहोत. अधिक पुढे जात, आम्ही वापरकर्त्यांच्या अनुभवामध्ये वाढ करत राहू, तसेच सेवांची व्यापक श्रेणी देत राहू.’’

एंजल वन लि.चे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या व्यवसाय मेट्रिक्समध्ये प्रबळ वाढ दिसत आहे, जेथे आम्ही आमच्या डिजिटल क्षमतांचा प्रभावीपणे फायदा घेत आहोत. आमच्या सातत्याने सुधारित कामगिरीमधून आमच्या उत्पादनाचा उच्च दर्जा, एकसंधी ग्राहक अनुभव, प्रबळ डिजिटल मार्केटिंग धोरणे आणि निर्माण करण्यात आलेला सहभागात्मक प्रवास दिसून येते.’’

एंजन वनने त्यांचे सुपर अॅप लाँच केले, जे सुलभता, पारदर्शकता, उपलब्धता, खात्रीशीरता आणि चपळता या पाच प्रमुख आधारस्तंभांवर डिझाइन करण्यात आले आहे. हे अॅप सर्व वापरकर्त्यांसाठी आयओएस आणि अँड्रॉईडवर उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!