अंजनगावच्या सरपंचपदी प्रतिभा परकाळे बिनविरोध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । बारामती । बारामती तालुक्यातील अंजनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दुसऱ्यांदा प्रतिभा दिलीप परकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वीच्या सरपंच सविता परकाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागी प्रतिभा परकाळे यांची बिनविरोध निवड पार पडली. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब परकाळे, माजी संचालक दादासाहेब मोरे, माजी सरपंच दिलीप परकाळे, सुरेश परकाळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष परकाळे, उपसरपंच सुभाष वायसे, विलास परकाळे, मिलिंद मोरे यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. एन. मुळे व ग्रामसेवक मुलाणी यांनी काम पाहिले.


Back to top button
Don`t copy text!