दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२३ | फलटण |
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, फलटण व ग्रामपंचायत कोळकी (ता. फलटण) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन योजनेंंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ कार्यशाळा शुक्रवार दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे आयोजित केली आहे.
या कार्यशाळेच्या आसरा सोशल फाऊंडेशन पुणे व यशदा पुण्याच्या व्याख्यात्या श्रीमती अर्चना मोरे प्रमुख मार्गदर्शिका असणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच जि.प. साताराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्रीमती अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) श्रीमती क्रांती बोराटे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ कोळकी उपस्थित राहणार आहेत.