सत्ताधारी नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे स्वखर्चातून काम करतोय : अनुप शहा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण शहरामधील धामट घर ते करावा यांचे घर येथे असणारे गटार नेहमीच तुंबून जात होते. फलटण नगरपरिषदेच्या सत्तेमध्ये असणाऱ्या नगरसेवकांना वारंवार सांगून सुध्दा नगरसेवकांनी गटार न केल्याने मी स्वखर्चातून गटार करीत आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मी कायमच कार्यरत होतो व ह्या पुढे सुध्दा कार्यरत राहणार आहे, अशी माहिती फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या काही कामासाठी गटार उघडले होते. मात्र बंदिस्त पाईपलाईन केली नाही. सदर गटार उपसल्यामुळे पाणी साठून राहत होते व ते परत रहिवाशांच्या घरांमध्ये शिरत होते. सदरील बाब माझ्या निदर्शनास आणून दिल्याने तातडीने स्वखर्चातून सदरचे गटाराचे काम सिमेंट पाईप लाईन टाकून दुरुस्त केलेले आहे, असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!