काँग्रसचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०२ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात पार पडला.

काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमीर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मीनगर येथील बारवबाग येथे अमीर शेख मित्रमंडळ यांच्या वतीने एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, हडपसर, पुणे यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. सदरील उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.

यासोबतच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन देखील करण्यात आलेले होते. यावेळी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. वृद्धाश्रममधील सर्व वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत आमिर शेख यांनी केक कापून वृद्धांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाच्या ठिकाणीच अमीर शेख यांनी मित्रपरिवार व हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!