राज्यभरात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महाराष्ट्रात पावसाच्या दडीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून लवकरच राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या निकषांनुसार १०० टक्के दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

स्थैर्य,सातारा, दि. २२ सप्टेंबर : महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. सोयाबीन, कापूस आणि उसाचे अतोनात नुकसान झाले असून राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १०० टक्के दुष्काळ जाहीर होणार असून एनडीआरएफच्या निकषांनुसार बळीराजाला मदत दिली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

खरीप पिकांची बिकट अवस्था आणि आढावा

राज्यातील सुमारे २० जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने पिके वाळून गेली आहेत. आपल्या आयुष्यात असा भीषण दुष्काळ कधी पाहिला नसल्याची खंत सहकारमंत्री पाटील यांनी व्यक्त केली. पिकांचे झालेले अतोनात नुकसान पाहता शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रशासनाने राज्यात दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला असून मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे शुल्क माफी आणि पाणीटंचाई उपाययोजना

नुकसान भरपाईसोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी, वीजबिल माफी आणि पाणीटंचाई असलेल्या भागात टँकर सुरू करण्याचे काम शासनाकडून हाती घेण्यात आले आहे. शासकीय नियमावलीनुसार संपूर्ण प्रक्रियेची पूर्तता करून महिन्याभरात दुष्काळाची अधिकृत घोषणा केली जाणार असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार दिला जाणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!