विविध क्षेत्रात महिलांचे कार्य कौतुकास्पद : पूनम कांबळे


दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । बारामती । राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा ,औद्योगिक, शेती , व इतर क्षेत्रात महिलांनी शिक्षण घेऊन घेतलेली भरारी आदर्शवत असून खऱ्या अर्थाने माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा महिला पुढे नेत असून विविध क्षेत्रात महिलांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे कटफळ ग्रामपंचायत च्या सरपंच पूनम किरण कांबळे यांनी प्रतिपादन केले.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कटफळ ग्रामपंचायतच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान आणि महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी “होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सरपंच पूनम कांबळे बोलत होत्या.

कटफळ ग्रामपच्यात महिला सदस्यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपसरपंच सीमा मदने ,सदस्य संध्याराणी झगडे, सविता लोखंडे , संध्या मोरे व विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.
मुलगी वाचवा, लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्या करू नका,पर्यावरण वाचवा आदी विषयावर उखाणे व नृत्य, विविध खेळ घेण्यात आले.
अनिल सावळेपाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम सीमा मोकाशी,द्वितीय पूजा झगडे, तृतीय संगीता झगडे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

गायन सलीम सय्यद यांनी केले तर उपस्तितांचे आभार उपसरपंच सीमा मदने यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!