पशूवैद्यकीय क्षेत्रातील विविध गौरव पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे पशूपालकांना आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२४ | फलटण |
ज्येष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत देण्यात येणार्‍या पशूवैद्यकीय क्षेत्रातील विविध गौरव पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशूपालकांना प्रतिष्ठानमार्फत करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र (पुणे) या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेची स्थापना दि. १ मे १९९३ रोजी झाली. पुण्यातील पशूसंवर्धन क्षेत्रातील सेवानिवृत्त, ज्येष्ठ व समविचारी पशूवैद्यांनी एकत्र येऊन या संस्थेची विधीवत नोंदणी केली आहे.

दरवर्षी संस्था पशूसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पशूवैद्यांना तसेच पशू वा पक्षी पालकास गौरव पुरस्कार प्रदान करते. त्यानुसार यावर्षी सुध्दा संस्थेकडून एका पुरूष पशूवैद्यास उत्कृष्ठ पशूवैद्य पुरस्कार, एका महिला पशूवैद्यास उत्कृष्ठ पशूवैद्य पुरस्कार, एका पशूपालकास उत्कृष्ठ पशूपालक पुरस्कार, एका कुक्कुटपालकास उत्कृष्ठ कुक्कुटपालक पुरस्कार, एका शेळीपालकास उत्कृष्ठ शेळीपालक पुरस्कार, एका मेंढीपालकास उत्कृष्ठ मेंढीपालक पुरस्कार आणि उत्कृष्ट पशूविज्ञान अध्यापक / पशूवैज्ञानिक पुरस्कार असे एकूण सात गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ह्यापैकी उत्कृष्ट शेळीपालक व मेंढीपालक हे पुरस्कार फलटणचे दिवंगत कृषीतज्ज्ञ पद्मश्री बी. व्ही. निंबकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येतात.

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रू. ५०००/- रोख आणि शाल, श्रीफळ देवून पारंपरिक सत्कार असे प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप असते.

पुरस्कारार्थींची निवड त्रयस्थ, तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात येते. तरी उपरोक्त नमूद विविध उत्कृष्ट पुरस्कारांसाठी इच्छुकांकडून दि. ३० एप्रिल २०२४ पर्यंत माहिती अर्ज मागविण्यात येत आहेत. पशूपालकांनी विहित मुदतीत उचित अर्ज करावेत. अर्जाच्या फॉर्मसाठी खाली दिलेल्या ई-मेल किंवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

ई-मेल : srvetmah@gmail.com
डॉ. सुनील राऊतमारे, निंबकर कृषी संशोधन संस्था, फलटण
सचिव, ज्येष्ठ पशूवैद्य प्रतिष्ठान. मंगेश सोनवलकर.
भ्रमणध्वनी क्र. : ९४२३०१२४९४.
भ्रमणध्वनी क्र. : ७५८८६८५८६७ /८००७७८६३७४


Back to top button
Don`t copy text!