सिंहगड चा ‘कल्याण दरवाजा’ ठरला लक्षवेधी


दैनिक स्थैर्य । १३ मार्च २०२३ । बारामती । छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शुक्रवार दि.१० मार्च रोजी बारामती शहरात साजरी करण्यात आली या प्रसंगी शहरातून काढलेल्या मिरवणुकीत सिंहगडचा ‘कल्याण दरवाजा ‘ हा चित्ररथ देखावा लक्षवेधी ठरला.

हवेली तालुक्यातील सिहगडच्या पायथ्याशी असलेले कल्याण गाव येथील हिंदवी स्वराज्याचे शिलेदार सरदार भिकाजी बिन सूर्याजी डिंबळे सरपाटील होते त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे वशंज बारामती शहर भाजपा चे सरचिटणीस प्रमोद डिंबळे सरपाटील व सौ पूजा व समस्त डिंबळे सरपाटील परिवार आणि हिंदवी स्वराज्याचे शिलेदार सरदार डिंबळे सरपाटील प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सदर देखावा उभारण्यात आला होता २० फूट उंच व १६ फूट रुंद असा देखावा उभारण्यात आला होता.

सिंहगड ताब्यात घेताना नरवीर तानाजी मालुसरे यांना सुद्धा कल्याण दरवाजा व कल्याण मधील मावळ्यांनी मदत केलेला उल्लेख इतिहासात आहे. प्रसाद व प्रफुल्ल डिंबळेपाटील यांनी सदर देखाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी मावळे व त्यांनी केलेले लाठी काठी ,ढाल पट्टा प्रत्येशिक व महिलांची फुगडी लक्षवेधी ठरली.

सदर देखावा समोर कोणताही डीजे न लावता पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत वेळेत सदर देखावा मिरवणुकीत दाखल झाला .


Back to top button
Don`t copy text!