फलटण शहरात मद्यधुंद १८ चाकी ट्रेलरचालकाचा धुमाकूळ; अनेक वाहनांना धडक, क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याभोवतीचे कुंपणही तोडले


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहरात गुरुवारी १८ चाकी ट्रेलरचा चालक मद्यधुंद अवस्थेत ट्रेलर चालवत होता. त्याने अनेक ठिकाणी अपघात केला असून अनेक वाहनांचे नुकसान केले आहे, तसेच क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याभोवती असलेल्या कुंपणालाही धडक दिल्याने हे कुंपण तुटले आहे.

या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी ट्रेलरचालक देवीप्रसाद जगदेव यादव (रा. लबेदा, प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे.

या अपघातांत अनंत मंगल कार्यालय, कोळकी, ता. फलटण येथे ट्रेलरने धडक दिल्याने अल्टो कार (क्र. एमएच १२ सीडी ९५१७) चे नुकसान झाले, तर कारमधील सोमनाथ श्रीधर माने (रा. जाधववाडी) हे किरकोळ जखमी झाले.

दुसर्‍या अपघातात उत्तम मारूती पेटकर (रा. नरसोबानगर, कोळकी) यांच्या मालकीच्या महिंद्रा ट्रॅक्टर (क्र. एमएच ११ बीए ०५४४) व त्यासोबत असलेल्या ट्रॉलीला ट्रेलरने धडक दिल्याने त्याचे नुकसान झाले.

त्यानंतर तिसर्‍या अपघातात ट्रेलरने क्रांतिसिंह नाना पाटील चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याभोवती असलेल्या कुंपणास धडक दिल्याने त्याचेही नुकसान झाले आहे.

ट्रेलरचालकाविरूध्द उत्तम मारूती पेटकर (रा. नरसोबानगर) यांनी तक्रार दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना. हेमा पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!