कोळकीमधील स्मशानभूमी रस्त्यावरील पथदिवे आठ दिवसांपासून बंद; ग्रामसेवकाचे दुर्लक्ष


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटणचे उपनगर समजल्या जाणार्‍या कोळकी गावातील स्मशानभूमी रस्त्यावरील पथदिवे गेले आठ दिवस बंद आहेत, ही अतिशय निंदनीय बाब आहे.

याबाबत वारंवार कोळकीच्या ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सदस्यांनी पथदिवे सुरू करण्याच्या सूचना देवूनही ग्रामसेवकाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, त्यामुळे या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!