‘देशाच्या अखंडतेचा अपमान सहन करणार नाही’; लेहला चीनचा भाग दाखवल्यामुळे सरकारचा ट्विटरला इशारा


 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२२: भारताच्या नकाशाला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी केंद्र सरकारने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला वॉर्निंग दिली आहे. ट्विटरने लेहला चीनचा भाग दाखवले होते. यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मंत्रालयाचे सचिव अजय साहनी यांनी ट्विटरला पत्र लिहून, भारताच्या अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा अपमान करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला.

हा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा ट्विटरवर प्रकाशित नकाशामध्ये लेहची जिओ-लोकेशन चीनमध्ये दाखवण्यात आली. यानंतर, भारत सरकारकडून ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सेला पाठवलेल्या पत्रात म्हटले की, लेह, लडाख क्षेत्राचे हेडक्वार्टर आहे. भारतीय संविधानानुसार, जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग आहेत. ट्विटरच्या निष्पक्षपणाबद्दल आणि तत्त्वांबद्दल पत्रात प्रश्न उपस्थित करण्यात आले.

भारताच्या भावनांचा आदरः ट्विटर

सरकारच्या पत्रानंतर ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, ट्विटर भारत सरकारबरोबर काम करण्यास वचनबद्ध आहे. तसेच, भारताच्या भावनांचा आदर करतो, असेही सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!