तालुक्यातील नागरिकांनी आपल्या भूमिपुत्रास खंबीर साथ द्यावी : बाळासाहेब काशीद; कोळकीत प्रचाराचा शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. 24 एप्रिल 2024 | फलटण | कोळकी गावासह तालुक्यातील ग्रामस्थांनी आपल्या असणाऱ्या भूमिपुत्र म्हणजेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी खंबीर अशी साथ द्यावी; असे मत कामगार नेते बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केले.

कोळकी येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, आरपीआयचे विजय येवले, राजु मारूडा, सामाजिक कार्यकर्ते सुधीर अहिवळे, मुन्ना शेख, संजय निकाळजे, सतिश शेडगे, संदीप नेवसे, संदीप कांबळे, रणजित जाधव, यशवंत जाधव, सतिश पवार, सचिन हजारे, चंदन वस्ताद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!