बारामती रोटरी क्लबच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवणार – दर्शना गुजर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । बारामती । रोटरी क्लबच्या माध्यमातून बारामती पंचक्रोशीमध्ये आगामी काळात विविध विधायक उपक्रम राबविले जातील, अशी ग्वाही रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 च्या प्रांतपाल मंजू फडके यांनी नवनिर्वाचित रोटरी क्लब बारामतीच्या अध्यक्षा दर्शना गुजर यांच्या वतीने दिली.

रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ गुरुवार २२जून रोजी झाला . या प्रसंगी त्या बोलत होत्या. बारामती रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे दर्शना संदीप गुजर यांनी तर सचिवपदाची सूत्रे अभिजित विजयराव बर्गे यांनी स्विकारली. या प्रसंगी सहायक प्रांतपाल नितीन दोशी, फाऊंडेशन डायरेक्टर चारुदत्त श्रोत्री, व्होकेशनल डायरेक्टर वसंतराव मालुंजकर, विश्वास फडके, मावळते अध्यक्ष अजय दरेकर सचिव अरविंद गरगटे आदी उपस्थित होते.

बारामतीत आगामी काळात ग्रीन पिरेडस या उपक्रमाअंतर्गत एक हजार गरजू महिलांसाठी काम केले जाणार आहे. टंचाईग्रस्त गावातील विंधनविहीरींचे पुर्नजीवन करणे, पाणी बचतीसाठी शाळा महाविद्यालयांसह सोसायटीत वॉटर एरिएटर्स बसविणे, अशी कामे करणार असल्याचे दर्शना गुजर यांनी सांगितले. अजय दरेकर यांनी गतवर्षीच्या कामाचा आढावा घेतला.

नूतन कार्यकारणी  पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष: अतुल गांधी, खजिनदार- रविकिरण खारतोडे, पदसिद्ध सदस्य-किशोर मेहता,सदस्य- अली असगर बारामतीवाला, मल्लिकार्जुन हिरेमठ, सचिन चावरे, प्रतीक जोशी, हर्षवर्धन पाटील, कौशल शहा, अजय दरेकर, अरविंद गरगटे, अब्बास नाशिकवाला, अंजली गांधी, दत्तात्रय बोराटे, निखिल मुथा. प्रीती पाटील यांनी परिचय करून दिला. अरविंद गरगटे यांनी आभार मानले, डॉ हणमंतराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!