विडणी: स्पर्धा परीक्षेत गावाची मोहर – चौघांची प्रशासकीय सेवेत निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

विडणी गावातील चार तरुणांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत राज्य उत्पादन शुल्क व बँक क्षेत्रात विविध पदांवर उत्तुंग यश मिळवले आहे.

स्थैर्य, विडणी, दि. २९ जुलै : फलटण तालुक्यातील विडणी गावातील तरुणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये दैदीप्यमान यश संपादन करत गावाच्या नावात भर घातली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि बँक परीक्षांच्या माध्यमातून गावातील चार सुपुत्रांची विविध प्रशासकीय व सेवा पदांवर निवड झाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून विडणी येथील महेश कदम आणि महेश टिळेकर यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक (Sub Inspector) पदी निवड झाली आहे. दोघांनीही यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असतानाच सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ही पदोन्नती मिळवली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदी निवड

तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अक्षय जगताप आणि ज्ञानेश्वर पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक (Clerk) पदासाठी निवड झाली आहे. अक्षय जगताप यांनी विडणी ग्रामपंचायतीच्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेतून अभ्यास करत हे यश संपादन केले आहे.

या सर्व यशस्वी उमेदवारांचे अवर सचिव धीरज अभंग आणि विडणीचे सरपंच सागर अभंग यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button
Don`t copy text!