शिक्षण आणि करिअर क्षेत्रात मोठी संधी; NTA मध्ये विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) विविध विषयांचे तज्ज्ञ आणि भाषांतर समीक्षकांच्या पॅनेलसाठी ऑनलाइन अर्ज मागवले असून इच्छुकांना ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १७ सप्टेंबर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) प्रश्नपत्रिका निर्मिती, समीक्षा आणि भाषांतराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विषय तज्ज्ञ आणि अनुवाद समीक्षक (Translation Reviewer) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून यासाठी ९ ऑक्टोबर अंतिम मुदत देण्यात आली आहे.

पात्रता आणि अनुभव

या प्रक्रियेत सेवावृत्त किंवा कार्यरत प्राध्यापक, संशोधक, शिक्षक आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होऊ शकतात. भाषांतर समीक्षक पदासाठी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) आणि किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एआय (AI) द्वारे तयार केलेल्या भाषांतराची अचूकता तपासणे आणि प्रादेशिक भाषांमधील प्रश्नांचा दर्जा राखणे हे या तज्ज्ञांचे मुख्य काम असणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि मुदत

इच्छुक उमेदवारांना nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती सादर करावी लागणार आहे. प्राप्त अर्जांमधून उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि प्रात्यक्षिक चाचणीच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या तज्ज्ञांचा समावेश पुढील ३ वर्षांसाठी NTA च्या अधिकृत पॅनेलमध्ये केला जाणार आहे. परीक्षा प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च शैक्षणिक दर्जा आणण्यासाठी एजन्सीने हे पाऊल उचलले आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!