CBSE बोर्ड परीक्षा १० वी आणि १२ वीच्या नियमांत मोठा बदल; शाळांसाठी नवे निर्देश जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सीबीएसई बोर्डाने आगामी १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याबाबत शाळांना अत्यंत कडक निर्देश जारी केले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १७ सप्टेंबर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १० वी आणि १२ वीच्या आगामी बोर्ड परीक्षांसाठी शाळांना महत्त्वाची नियमावली जारी केली आहे. परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी (LOC – List of Candidates) सादर करताना विद्यार्थ्यांची सर्व वैयक्तिक माहिती, विषय आणि आवश्यक कागदपत्रे अत्यंत अचूकपणे नोंदवण्याचे आदेश मंडळाने शाळांना दिले आहेत.

माहितीतील चुका ठरतील शाळांची जबाबदारी

शाळांकडून विद्यार्थ्यांच्या माहितीत होणाऱ्या चुकांमुळे पुढील टप्प्यात निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी सीबीएसईने हे कठोर पाऊल उचलले आहे. एकदा दाखल केलेल्या यादीत नंतर कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळांनी माहिती भरताना विशेष काळजी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

सर्व संबंधित शाळांना ठरवून दिलेल्या वेळेत पात्र विद्यार्थ्यांचा डेटा संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याची माहिती अपूर्ण राहिल्यास किंवा चुकीची नोंदवली गेल्यास त्याची पूर्ण जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल, असेही सीबीएसईने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

 

Back to top button
Don`t copy text!