फलटण: नळांना गढूळ पाणी; परंतु पिण्यास स्वच्छ – नगरपरिषदेचे स्पष्टीकरण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे नीरा उजव्या कालव्यातील पाणी गढूळ झाले असून जलशुद्धीकरणास वेळ लागत असला तरी पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २९ जुलै : धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नीरा उजव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यात गढूळपणा वाढला आहे. त्यामुळे हे पाणी शुद्ध करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असून शहरातील नळांना किंचित तांबूस रंगाचे पाणी येत आहे; मात्र हे पाणी पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण फलटण नगरपरिषदेतर्फे देण्यात आले आहे.

जलशुद्धीकरणाला वेळ

पावसामुळे कालव्यातील पाण्याचा रंग बदलला असून ते शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण क्षमतेने सुरू आहे. फिल्टर प्रक्रियेमुळे पाणी स्वच्छ होण्यास काहीसा कालावधी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याचा रंग तांबूस दिसत असला तरी ते आरोग्यदायी आणि पिण्यायोग्य आहे.

नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी शहरातील सर्व नागरिकांना पाण्याचा योग्य वापर करण्याचे आणि या तांत्रिक परिस्थितीची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. पाणी शुद्धीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच पूर्ववत स्वच्छ पुरवठा होईल.

Back to top button
Don`t copy text!