दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२४ | फलटण |
फलटणनजीक नवामळा (ठाकुरकी) येथील किसन रुस्तुम शिंदे (आबा) यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तथा फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य, ठाकुरकी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच, पद्मावती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, जिजाई मंगल कार्यालयाचे मालक असा अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल करीत सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग होता.
किसन शिंदे यांच्या पश्चात पत्नी, पाच विवाहित मुलगे, चार विवाहित मुली, सुना, नातवंडे, परतोंडे असा मोठा परिवार आहे.
राहत्या घरापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये फलटण, बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस, माण, पुरंदर, पुणे, मुंबई आदी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव सहभागी झाले होते. ठाकुरकी येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.