उत्तमरांव आढाव यांचे दुःखद निधन


स्थैर्य, पुणे, दि. १२: पुणे- कालकथित उत्तमराव बबनराव आढाव वयवर्ष 55 राहणार रामटेकडी, हडपसर त्यांच्या निधनाची बातमी कानावर आदळल्याने, संपूर्ण आढाव कुटुंबियांना दुःखाच्या गर्तेत लोटले, उत्तमरांवाच्या अचानक जाण्याने आढाव कुटुंबियांतील चार भावंडांची चौकट मोडली, यांचे अतिशय दुःख होत आहे,त्यांच्या अचानक जाण्याने कौटुंबिक आणि सामाजिक नुकसान न भरून येणारे आहे, उत्तमरांवानी पुणे शहरातील पूर्व भागामध्ये विशेषतः लष्कर कँप,हडपसर, महंमदवाडी, रामनगर, रामटेकडी आणि स्वामी विवेकानंद नगर येथील गोरगरिबांना, वंचित घटकांतील निराश्रित लोकांकरिता अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेवून त्यांनी मदतीचा हात सतत सर्वांकरिता पुढे केला,असे उत्तमरांचे हरहुन्नरी आणि निःस्वार्थी व्यक्तीमत्त्व होते, त्याच्या अचानक जाण्याने म.फुले,छ.शाहू, डॉ.आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद नगर मधील बुद्ध विहाराच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच रामटेकडीमध्ये विद्यार्थी विकास केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोलाचा पुढाकार आहे, अशा निःस्वार्थी व्यक्तीमत्त्वास सर्वांना अंतःकरणपुर्वक आदरांजली वाहताना मन अगदी गहिवरून आले.

त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, पत्नी,सुना नातवंडे तिनं बंधू असा परिवार असून मोठी मुलगी फिजिओथेरपिस्ट असून मोठा मुलगा माॅडन काॅलेजमध्ये नोकरीस आहे तर धाकटा मुलगा स्वयंरोजगार, व्यावसायिक आहे.

उत्तमराव आढाव हे राष्ट्रवादी काँग्रेस, हडपसर विभागाचे उपाध्यक्ष होते तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रोफेसर विलास आढाव यांचे ते बंधू होते


Back to top button
Don`t copy text!