

ग्रामपंचायत विडणी आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार नोंदणी आणि अद्यावत शिबिराला विडणीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्थैर्य, विडणी, दि. ०६ जून : ग्रामपंचायत विडणी आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विडणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आधार नोंदणी आणि अद्यावत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सागर अभंग यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना नव्याने आधार नोंदणी करणे आणि जुन्या आधार कार्डमधील माहिती अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गावातील अनेक नागरिकांनी उपस्थित राहून या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, उपसरपंच मनीषा नाळे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली कोल्हे, दत्तात्रय अबदागिरे, कैलास जगताप, माजी सरपंच शरद कोल्हे आणि अनिल शेंडे उपस्थित होते.
याशिवाय भारतीय डाक विभागाचे अधिकारी चिदानंद दिंडुरे, दत्तात्रय ताटे, योगेश माने, संतोष नेरकर तसेच ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे यांनी शिबिराच्या नियोजनात सहभाग घेतला.
