
स्थैर्य, सातारा, दि. 5 नोव्हेंबर : येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार व लेखक मुकुंद फडके यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये होणार आहे. या उपक्रमाच्या समन्वयक स्वाती राऊत असून सर्वांनी या संवाद कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम नानल, शिरीष चिटणीस, डॉक्टर संदीप श्रोत्री आणि विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.

