
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.१४: सातारा एसटी आगाराच्या वकॅशॉपच्या आवारात भंगार चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विजय कुचेकर, रा. संगमनगर झोपडपट्टी, सातारा असे संशयीताचे नाव आहे. संशयीत हा दि. 14 रोजी दुपारी 3 वाजता सातारा एसटी आगाराच्या वकॅशॉपच्या आवारात अंदाजे 15 किलो वजनाचे भंगारातील अॅल्युमिनिअमचा पत्रा नेताना आढळून आला. याप्रकरणी कर्मचारी रेश्मा गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादवरून विजय कुचेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार पवार करत आहेत.
