…तर द्विपक्षीय संबंध बिघडतील! शेतकरी आंदोलनावरून भारताचा कॅनडाला इशारा


स्थैर्य, नवी दिल्ली (वृत्तसंस्था), दि.५ : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला उत्तर दिले आहे. भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना याबाबत समन्स बजावले आहेत. पंतप्रधान ट्रुडो आणि कॅनडातील नेत्यांचे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबतचे वक्तव्य भारताच्या अंतर्गत मुद्यातील हस्तक्षेप असून हे कधीही स्वीकारले जाणार नाही, असे कॅनडाच्या आयुक्तांना बजावले.

कॅनडा भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करत असेल द्विपक्षीय संबंधांना धोका पोहचेल, असेही भारताने स्पष्ट केले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा शेतक-यांचा अधिकार असून या अधिकारासाठी कॅनडा कायमच शेतक-यांबरोबर उभा राहील, असे वक्तव्य ट्रुडो यांनी केले होते. त्यावर भारताने नाराजी व्यक्त केली होती. 

ट्रुडो यांच्या या वक्तव्यानंतर कॅनडातील भारतीय दुतावासाबाहेर नागरिकांनी गर्दी झाली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचेही भारताने कॅनडा उच्चायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. कॅनडा सरकार भारतीय दुतावासातील सर्व कर्मचा-यांची सुरक्षा करेल, असा विश्वास भारताने व्यक्त केला. शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटला नसून ८ डिसेंबरला आंदोलकांनी भारत बंदची हाक दिली आहे. तिन्ही केंद्रीय कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!