शिर्डी संस्थान ‘ड्रेसकोड’: तृप्ती देसाईंनी आंदोलन मागे घ्यावं अन्यथा… महाराष्ट्र ब्राम्हण संघटनेचा गंभीर इशारा


 

स्थैर्य, शिर्डी, दि.५: शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय
पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे.
मात्र, मंदिर साईबाबा मंदिर संस्थानाच्या या सूचनेला भूमाता ब्रिगेडच्या
तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे. याशिवाय संस्थानच्या पोशाखासंबंधीच्या
सूचनांचे फलक येत्या १० डिसेंबरला काढून टाकणार असल्याचा इशाराही त्यांनी
दिला आहे. दरम्यान तृप्ती देसाई यांच्या भूमिकेला महाराष्ट्र ब्राम्हण
संघटनेने तीव्र विरोध केला आहे.

तृप्ती
देसाई यांनी आंदोलन मागे घ्यावं अन्यथा महाराष्ट्र ब्राम्हण संघटना १०
डिसेंबरला त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष मंदार
आफळे यांनी दिला आहे.
मंदिर ड्रेसकोडबाबत शिर्डी साईबाबा संस्थानने घेतलेला
निर्णय अतिशय योग्य आहे. तोकडे कपडे घालून मंदिर प्रवेशास मनाई असल्याचा
बोर्ड लावून संस्थानाने योग्य केल असल्याचे आफळे यांनी सांगितलं.
देवस्थानांच्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य बघण्याची काही गरज नाही. या
देशात महिला स्वतंत्र आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणचे काही नियम असतात. ते
पाळने बंधनकारक आहे असं आफळे यांनी म्हटलं.

सोबतच प्रत्येक
धर्माच्या प्राथर्नास्थळाचे काही नियम असतात ते पाळल्याशिवाय तेथे प्रवेश
दिला जात नाही. त्यामुळं तृप्ती देसाई यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावं
अन्यथा महाराष्ट्र ब्राम्हण संघटनेलाही मैदानात उतरावं लागेल. त्यामुळं
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून सरकारनेही तृप्ती देसाई
यांना १० डिसेंबरला रोखावं अशी विनंती आफळे यांनी केली.

काय आहे प्रकारण?

शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरात संस्थानने भाविकांच्या ड्रेसकोडसंबंधीचे
सूचनाफलक लावले आहेत. त्यावर म्हटले आहे की, ‘साईभक्तांना विनंती आहे की,
आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा
परिधान करावी.’ इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावण्यात आले
आहेत.

संस्थानचा कारभार सध्या तदर्थ समितीमार्फत पाहिला जात आहे.
संस्थानेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून
हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येते. इतर
देवस्थानांप्रमाणेच शिर्डीतही कपड्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी
यापूर्वीच काही भाविकांमधून होत होती. शिर्डीत दूरवरून भाविक येतात.

अनेक
जण पर्यटनाला यावे, तसे तोकड्या कपड्यांमध्ये येतात. त्याच कपड्यांमध्ये
ते दर्शनालाही जातात. ही गोष्ट खटकत असल्याने काही भाविकांची ही मागणी
होती. सध्या तरी याची सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ विनंतीवजा सूचना आहे.
मात्र, याची अंमलबजावणी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेकडून कशी केली जाते,
हेही लवकरच कळेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!