शेतकरी आणि ग्राहकांसाठी ‘कुरोली फुड्स’चे कार्य कौतुकास्पद : जिल्हाधिकारी शेखर सिंह


स्थैर्य, फलटण दि.11 : फलटण तालुक्यात कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘कुरोली फुड्स’ या कंपनीचे शेतकरी आणि ग्राहकवर्गासाठीचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले.

कुरोली फुड्सचे संचालक रामदास कदम यांच्या गिरवी येथील फार्म हाऊसवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कुरोली फुड्सचे संचालक उमेश नाईक निंबाळकर, शिवतेज नाईक निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी कंपनीच्या कार्याची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतली.


Back to top button
Don`t copy text!