कोळकी: श्री हनुमान मंदिर जिर्णोद्धार – दात्यांना मदतीचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

मालोजी नगर, कोळकी येथील प्रसिद्ध श्री हनुमान मंदिराच्या बाहेरील परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि उर्वरित विकासकामांसाठी ग्रामस्थांनी दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

स्थैर्य, कोळकी, दि. 20 जुलै : मालोजी नगर येथील प्रसिद्ध श्री हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी आणि बाहेरील परिसराच्या उर्वरित कामांसाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

पूर्वीची कामे आणि पुढील नियोजन

यापूर्वी अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मंदिराचा गाभारा, सभामंडप, रंगकाम, तसेच दरवाजे आणि ग्रील बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या बाहेरील सुमारे आठ गुंठे परिसरामध्ये मंदिर आणि दोन इमारतींचे बांधकाम यापूर्वीच झाले आहे. आता उर्वरित जागेमध्ये गार्डन, विविध कार्यक्रमांसाठी स्टेज, पत्रा शेड आणि संरक्षक भिंत उभारण्याचे ग्रामस्थांचे नियोजन आहे.

दात्यांच्या नावाचा कायमस्वरूपी सन्मान

जे देणगीदार या विकासकामांसाठी पुढे येऊन गार्डन, स्टेज किंवा शेडचे काम पूर्ण करतील, त्यांचे नाव संबंधित वास्तूला कायमस्वरूपी दिले जाईल, असा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या विकासकामांसाठी मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी प्रदीप भरते (9765661181), योगेश भानुशाली (7020278736) आणि केदार गोसावी (7047311711) यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top button
Don`t copy text!