निवृत्ती केंजळे यांचे निधन


स्थैर्य, कोरेगांव, दि.११:  येथील कठापूर गावचे माजी सरपंच निवृत्ती परशुराम केंजळे (वय ९२ वर्षे) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

वारकरी सांप्रदायातील निवृत्ती केंजळे यांना कठापूर पंचक्रोशीत आण्णा या नावाने ओळखले जात होते. निवृत्ती केंजळे हे प्रगतशील शेतकरी तसेच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कामात नेहमीच सक्रीय होते.

त्यांच्या पश्चात ४ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे यांचे ते वडील होत. निवृत्ती केंजळे यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!