फलटण: डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निनाद दोशी – कार्यकारिणी जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी निनाद दोशी यांची निवड झाली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 20 जुलै : फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात असोसिएशनच्या अध्यक्षपदी निनाद दोशी, तर सचिवपदी निखिल गांधी यांची एकमताने निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी आणि पदाधिकारी

या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी चेतन गुंदेचा, महिला उपाध्यक्षपदी शिल्पा गांधी आणि खजिनदारपदी सागर तेली यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष बी. के. यादव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष निनाद दोशी व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षपदाची जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि कल्पकतेने पार पाडणार असल्याचे निनाद दोशी यांनी स्पष्ट केले. नूतन कार्यकारिणीचे लायन्स उपप्रांतपाल मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन आणि राजेंद्र कोठारी यांनी अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!