कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साधेपणाने होणार


 

स्थैर्य, पुणे, दि.१३: कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथील 1 जानेवारी रोजी होणारा विजयस्तंभ
अभिवादन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या दरम्यान जिल्हा
प्रशासन मानवंदना कार्यक्रम शिस्तबद्ध प्रातिनिधिक स्वरूपात व साध्या
पध्दतीने साजरा केला जाणार आहे. तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख केले.

पेरणे फाटा (ता. हवेली) येथे ऐतिहासिक
विजयस्तंभ 1 जानेवारी रोजी होणा-या मानवंदना कार्यक्रम तयारीची बैठक झाली.
यावेळी जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, संपूर्ण देश मागील ८ ते ९
महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्याच धर्तीवर राज्यातील अनेक
सण-उत्सव व सामाजिक,राजकीय कार्यक्रम सार्वजनिक पद्धतीने न करता साधेपणाने
साजरे केले आहे. प्रशासनाला कुठलाही जात, धर्म नसतो. कर्तव्ये महत्त्वाची
असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, मनपा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम,
परिवहन आणि आरोग्य अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींची आढावा घेण्यात आली.
त्यात कोरोना संपला असे म्हणता येणार नाही म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात
साध्या पद्धतीने मानवंदना कार्यक्रम होणार आहे असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन
त्यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!