
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.७: गुणवरे, ता.फलटण येथील ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयातील इयत्ता 3 रीत शिकणार्या श्रीराम लहू आडके (रा.शेरेवस्ती, मठाचीवाडी) या विद्यार्थ्याने नुकतेच मठाचीवाडी ते शिखर शिंगणापूर व परतीचा प्रवास असे सुमारन 87 किलोमीटरचे अंतर 2 तास 32 मिनिटात सायकलने प्रवास करुन पार केले. यातील शिंगणापूर ते कोथळे हा घाटाचा प्रवास फक्त 17 मिनिटात पूर्ण केला.
सदरची कामगिरी करण्यासाठी श्रीराम आडके यास त्याचे आई – वडील, आजोबा सुरेश आडके यांनी प्रोत्साहित केले. या कामगिरीबद्दल ईश्वरकृपा संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सचिव सौ.साधनाताई गावडे, पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे, शाळेचे प्राचार्य संदीप किसवे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रीराम याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
