
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । सातारा । केसरकर पेठ, सातारा येथील एका घरातून सुमारे पंधरा हजार रुपये किंमतीच्या संसार उपयोगी साहित्याची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी केसरकर पेठ सातारा येथील सनी अशोक काटकर वय 40, मूळ राहणार शनि मंदिराच्या पाठीमागे, शनिवार पेठ, सातारा सध्या राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, केसरकर पेठ, चार भिंती रोड यांच्या पत्र्याच्या शेड मधून शेडच्या पाठीमागील बाजूचा पत्रा अज्ञात चोरट्याने उचकटून 14 हजार 600 रुपये किमतीचे संसार उपयोगी साहित्य व रोख रक्कम चोरी करून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक आवळे करीत आहेत.
