पोलीसाला मारहाण करणाऱ्या युवकाला अटक


दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा पाेलीस दलात कार्यरत असणा-या एका पाेलीस उपनिरीक्षकास आज (शनिवार) युवकानं मारहण केल्याची घटना काेरेगाव शहरात घडली. या युवकास पाेलीसांनी अटक केली आहे.

कोरेगाव शहरात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यावर हा हल्ला झाला. या हल्ला प्रकरणी पाेलीसांनी अक्षय लालासाहेब पवार या युवकाला पकडलं. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, पीएसआय कदम यांना मारहाण करताना अक्षय समवेत आणखी एक युवक हाेता. ताे घटनेनंतर पळून गेला. त्याच्यावर देखील पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Back to top button
Don`t copy text!