पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित ‘अजिंक्य संवाद’ नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२४ | सातारा |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संचलित वृत्तविद्या व जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित ‘अजिंक्य संवाद’ नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी बापूजी साळुंखे सभागृह, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, सातारा येथे घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हरीष पाटणे, अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच विनोद कुलकर्णी, अध्यक्ष सातारा शहर पत्रकार संघ यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ लालबहादूर शास्त्री विद्यालय साताराचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर होते. कार्यक्रमास प्राध्यापक मधुसूदन पत्की, ज्येष्ठ संपादक व समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, प्राध्यापक जयंत लंगडे संपादक, लोकसाम्राज्य न्यूज समंत्रक प्रपाठक पत्रकारिता अभ्यासक्रम, श्री. वैभव सपकाळ, कार्यालयीन प्रतिनिधी तसेच श्री. प्रकाश महाडिक, कार्यालयीन प्रतिनिधी व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी मिलिंदा पवार यांनी केले तर प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी भारत देवकांत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रशिक्षणार्थी पूजा जगताप यांनी केला. तसेच प्रमुख पाहुणे पाटणे सर व कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकारितेमधील अडचणी व फायदे याबाबतीत माहिती दिली. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रपाठक पत्की सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थी मनोगतही झाले व नंतर अध्यक्ष अशोक तवर यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी सर्वांसमोर अनुभवांचे शिदोरी खुली केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत नमुना वृत्तपत्र ‘अजिंक्य संवाद’चा प्रकाशन समारंभ करण्यात आला. २०२३ पत्रकारिता अभ्यासक्रम बॅचचा निरोप समारंभ व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून हरीष पाटणे सर हे या अभासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच दैनिक पुढारीचे आवृत्तीप्रमुख यांची महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. विनोद कुलकर्णी हेदेखील पत्रकारिता अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी असून ते सध्या दैनिक ‘पुण्यनगरी’चे आवृत्तीप्रमुख व मसाप शाहूपुरी शाखाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठा साहित्य मंडळाचे विश्वस्त यांची मसाप पुण्याच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थी हभप अमोल जाधव यांनी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी आग्नेश शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.

सचिन धुमाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम प्राध्यापक जयंत लंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्टपणे पार पडला.


Back to top button
Don`t copy text!