दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण शहरातील विद्यानगरमध्ये असलेल्या दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्री हनुमानाचे दर्शन घेतले. श्रीमंत संजीवराजेंचे यावेळी मंदिराच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले.
या सोहळ्यास भाऊसाहेब कापसे, राहुल निंबाळकर, स्वानंद गोसावी, अजित शिंदे, जितेंद्र कदम, अमर राऊत, विकास इंगोले, धीरज कचरे, आदित्य निंबाळकर, अर्जुन ढाणे, नितीन भोंग, डॉ. चंद्रकांत जगदाळे, अंशुमन साळुंखे, निशांत गाडे यांची उपस्थिती होती.