माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी राहणार्या अंकली येथील अश्वांचे प्रस्थान

सूर्यकांत भिसे
दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | अकलूज |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अग्रभागी असणार्या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली (जि. बेळगाव) येथून झाले. यावेळी अश्वांबरोबर असलेल्या वारकर्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
प्रस्थानावेळी श्रीमंत सरदार उर्जितसिंह शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, युवराज विहानराजे शितोळे सरकार, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब अरफळकर, अजित परकाळे, निवृत्ती चव्हाण, माऊली गुळुजकर, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.