माहेश्वरी समाजातील महेश नवमी शोभायात्रा आनंदात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | फलटण |
फलटणमधील माहेश्वरी समाजातील ५१५६ वर्ष वी महेश नवमी माहेश्वरी उत्पत्ती दिवस सोमवार, २९ मे २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी विविध कार्यक्रम संपन्न झाले.

यावेळी फलटणच्या माहेश्वरी समाजातील अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच माहेश्वरी महिला अध्यक्षा, उपाध्यक्षा, समाजातील बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते. वृक्षारोपण, रक्तदान असे विविध उपक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी फलटणमधील निर्भया पथकाने या कार्यक्रमात सहभागी होऊन महिला व मुलींना मार्गदर्शनपर माहिती दिली. महिलांनी सोशल मिडियाचा वापर जपून करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत, असे निर्भया पथकाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

यावर्षी भगवान महेशजी यांच्या आरतीचा मान माहेश्वरी बंधू श्री. कुमार द्वारकादास भट्टड यांना मिळाला. सायंकाळी ५.०० वाजता फलटण शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान शिव-पार्वती व गणपती देखावा अतिशय मनमोहकरित्या सादर करण्यात आला होता. त्यानंतर माहेश्वरी समाजातील बंधू-भगिनींनी एकत्र येऊन महेश नवमीनिमित्त महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


Back to top button
Don`t copy text!