‘एक्सएलआर ८ स्पोर्ट्स न्युट्रिशन’चा भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकशी सहयोग करार


दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२३ | फलटण |
‘एक्सएलआर ८ स्पोर्ट्स न्युट्रिशन’ हा दर्जेदार क्रीडा आणि सुदृढतेसाठी पोषण पुरवण्यास कटिबद्ध असणारा ‘ब्रँड’ भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक ह्याच्यासोबत सहर्ष सहयोग घोषित करत आहे. ‘एक्सएलआर ८’ टीम अतिशय उत्साहाने उमरानचे स्वागत करते आणि आम्हाला असा विश्वास आहे की, त्याच्या कौशल्याला वाहिलेले त्याचे समर्पण आणि यशस्वी होण्याचा अढळ निर्धार आमच्या ‘ब्रँड’ला अगदी साजेसा आहे. वेगाने बॉल टाकण्याची त्याची विक्रमी क्षमता ‘नेव्हर स्लो डाऊन’ ह्या आमच्या ‘ब्रँड’च्या मंत्राशी सुसंगत आहे, असे ‘एक्सएलआर ८’ टीमने सांगितले.

ते पुढे म्हणतात की, ‘एक्सएलआर ८’ स्पोर्ट्स न्युट्रिशनमध्ये आम्ही क्रीडापटूंना, सुदृढतेविषयी जागरुक असणार्‍यांना आणि सक्रिय जीवनशैली जगणार्‍या प्रत्येकाला सर्वोच्च दर्जाचे यथायोग्य पोषण पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला समजते की, परिपूर्ण कामगिरी आणि परिणाम साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत, समर्पण आणि योग्य पोषणाचा मेळ साधणे आवश्यक असते. कच्चा माल मिळवण्यासाठीचे काटेकोर नियम, आमचे FSSAI संमत अत्याधुनिक उत्पादन केंद्र, आणि NABL कडून अधिस्वीकृती मिळवलेल्या स्वतंत्र प्रयोगशाळेकडून प्रत्येक बॅचची कसोशीने चाचणी अशासारख्या रसद पुरवठ्याच्या शृंखलेतील सर्व महत्त्वाच्या पैलूंवर आम्ही नियंत्रण ठेवतो.

आमची ‘ब्रँड’ टॅगलाईन ‘नेव्हर स्लो डाऊन’ आमच्या वेग वाढवण्याच्या, चिकाटीच्या, आणि कौशल्याकडे जात राहण्याच्या अढळ निर्धाराची साक्ष आहे. आम्ही असे मानतो की, क्रीडा आणि सुदृढतेमध्ये यश संपादन करण्यासाठी ‘कधीही हार मानायची नाही’ ही मानसिकता गरजेची असते. भारतीय क्रिकेट टीममधील सर्वांत वेगवान गोलंदाज उमरान मलिकशी करार करून आम्हाला आशा आहे की, आम्ही क्रीडापटूंच्या आणि सुदृढतेप्रती जागरूक असणार्‍या नव्या पिढीला कौशल्याचा ध्यास घेण्यासाठी आणि कधीही वेग कमी पडू न देण्यासाठी प्रेरणा देत राहू. आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत जाणार्‍या गरजांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने अभिनव प्रयोग करत असतो आणि आमच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये विस्तार करत असतो. गुणवत्ता, सुरक्षितता आणि अभिनवता ह्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेसह, एक्सएलआर ८ स्पोर्ट्स न्युट्रिशन क्रीडा आणि सुदृढता पोषण उद्योगात असाच एक आघाडीचा ‘ब्रँड’ राहील, असा माझा ठाम विश्वास आहे.

मी माझ्या प्रिय ग्राहकांना त्यांनी आमच्या ‘ब्रँड’ला दिलेल्या अढळ पाठबळासाठी आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासासाठी अनेक धन्यवाद देतो. आम्ही अतिदर्जेदार पोषण पुरवण्याकरिता आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या सुदृढतेचे ध्येय साध्य करायला मदत करण्याकरिता स्वत:ला वाहून घेतलेले आहे. चला तर, आपण सर्वजण मिळून स्वत:ला नव्या उंचीवर घेऊन जाऊया, “नेव्हर स्लो डाऊन”.


Back to top button
Don`t copy text!