चिमण्यांचं घटत प्रमाण धोकादायक….


स्थैर्य, फलटण, दि.२१: आज जागतिक चिमणी दिवस, चिमण्यानं बद्दल जागरूकता, संवर्धन , आणि प्रबोधन समाजामध्ये व्हावं, या हेतूने हा दिवस साजरा केला जातो..

पूर्वीच्या काळी म्हणजे थोड्या वर्षापूर्वी चिमण्यांचा चिवचिवाट आपल्या अंगणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये ठळकपणे जाणवून यायचा, अजूनही ग्रामीण परिसरामध्ये चिमण्या मुबलक प्रमाणात आहेत, या उलट वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अधिवास धोक्यात आले, त्याच बरोबर अन्नाची अनुपलब्धता, वाढते प्रदूषण, तसेंच शेतात किटनाशक, रासायनिक खतांचा होणार अतिवापर याचे दुष्परिणाम म्हणून आपल्या आजूबाजूच्या परिसरातील चिमण्यांचं प्रमाण हळू हळू कमी होत गेलं.

परिणामी वाढत्या शहरीकरणामुळे आणि वृक्षतोडीमुळे चिमण्याना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, छोट्या मोठ्या झाडा झुडुपमध्ये असणारी चिमण्यांची घरटी आता हळू हळू पत्र्याच्या शेड मध्ये, विजेच्या खांबांवर, भिंतीच्या कपारीमध्ये, खिडक्यांध्ये, पाहायला मिळतात, आणि अश्या ठिकाणी बांधलेली घरटी ही चिमण्यांच्या जीवितास धोका पोहचवणारी आहेत. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो, की जगण्यासाठी किती धडपड चिऊताई ला करावी लागत आहे.

त्यामुळे आपण देशी प्रजातींची झाडे लावली पाहिजेत, जेणेकरून चिमण्यांचा मूळ अधिवास निर्माण व्हायला मदत होईल, त्याच बरोबर उन्हाळा सूरु आहे, आपल्या अंगणामध्ये, चिमन्यांसाठी पाणी जरूर ठेवा,

निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, त्यामुळे निसर्गातील या घटकाच्या संवर्धनासाठी आपण ठोस पावले उचलायला हवीत.

प्रा. मंदार पाटसकर
पक्षी अभ्यासक, फलटण


Back to top button
Don`t copy text!