केंद्र सरकार पुढील 10 दिवसात लसीकरण सुरू करण्याच्या तयारीत


स्थैर्य, दि.५: लसीकरणाबाबत एक चांगली बातमी आली आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, सरकार येत्या 10 दिवसात लसीकरण करण्याच्या तयारीत आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, ड्राय रनमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे सरकार लसीकरणासाठी तयार आहे. या लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. त्यांची माहिती आधीपासूनच को-विन व्हॅक्सीन डिलीव्हरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये सेव आहे.

कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डला मिळाली आहे लसीकरणाची परवानगी

3 जानेवारीला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टीट्यूटला कोविशील्डला आपत्कालीन वापराची मंजुरी दिली आहे. तर, जायडस कॅडिला हेल्थकेअरच्या जायकोव-डीला फेज-3 ट्रायलसाठी अप्रूव्हल मिळाले आहे.

व्हॅक्सीनच्या साठवणीसाठी देशात 4 प्रायमरी स्टोअर

भुषण यांनी पुढे सांगितले की, देशात 4 प्रायमरी व्हॅक्सीन स्टोअर बनवले आहेत. हे करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये आहेत. याशिवाय, देशभराक 37 व्हॅक्सीन स्टोअर आहेत. या ठिकाणी व्हॅक्सीनची साठवण होईल आणि पुढे वितरणासाठी पाठवले जातील. यावेळी ब्रिटनमध्ये सापडलेल्या नवीन कोरोना स्ट्रेनबाबत बोलताना भुषण म्हणाले की, अद्याप देशात ब्रिटनमधील नव्या कोरोना स्ट्रेनचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले नाहाती. कोरोनामुळे देशाच्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर जो भार होता, तो आता कमी झाला आहे. देशाचा पॉजिटिविटी रेट कमी होऊन 5.87% वर आला आहे.


Back to top button
Don`t copy text!