खासदार रणजितसिंह यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ही माढा लोकसभा मतदारसंघात दि. 30 रोजी होणार असल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांच्या द्वारे समोर येत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या राज्यामध्ये गाजत आहे. भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध गोष्टी घडत आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मतदारसंघांमध्ये नेमके काय बदल होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!