फलटणमधून धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २५ एप्रिल २०२४ | फलटण |
महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरामध्ये पदयात्रा (घरभेटी) शुभारंभ गुरुवार, दि. २५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी गजानन चौक, फलटण येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून होणार आहे.

श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, चेतन सुभाषराव शिंदे, श्रीमंत सत्यजितराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, अमिरभाई शेख, पंकज पवार, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, संतोष सोनवलकर, अनिकेत नाळे, विरसेन सोनवणे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे व रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या पदयात्रेस (घरभेटी) सर्व बंधू-भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!