हरियाणात धावत्या बसमध्ये १० भाविक जिवंत जळाले

२५ हून अधिक भाजले; मथुरा-वृंदावनहून परतत असताना एक्स्प्रेस महामार्गावर अपघात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | हरियाणा |
हरियाणा येथे शुक्रवारी रात्री उशिरा कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर नूह येथील तावडू येथे रात्री १.३० वाजता भाविकांनी भरलेल्या बसला आग लागली. या अपघातात ८ जण जिवंत जळाले असून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीररीत्या भाजले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

बसमध्ये ६० जण प्रवास करत असल्याचे जखमींनी सांगितले आहे. हे सर्वजण नातेवाईक असून पंजाब-चंदीगड येथील रहिवासी आहेत. मथुरा-वृंदावनला भेट देऊन ते परतत होते. धावत्या बसमध्ये आग लागल्याचे पाहून स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. तसेच स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


Back to top button
Don`t copy text!